मुख्य सामग्रीवर वगळा

Google Gemini म्हणजे काय आणि तो कसा काम करतो?

Google Gemini म्हणजे नेमकं काय?

आपल्या सर्वांना ज्ञात असलेलं एक सर्वात मोठं Search Engine आहे. www.Google.com असं सामान्यपणे ओळखले जाते. म्हणजे कुठल्याही Browser मध्ये हा URL टाकला की Google Search Engine सुरू होते. ६ डिसेंबर २०२३ रोजी Google ने हे AI Technology Product Officially आपल्या समोर आणलं. Google Gemini चा स्वतःचा असा अँप आणि वेबसाईट देखील आहे. दोन्ही कडून ह्या Google च्या Technology चा Access घेऊ शकतो. प्रत्येक AI product मध्ये काही तरी असे विशेष फिचर्स असतात तसेच ह्या Gemini मध्ये पण आहेत. सरतेशेवटी मानवनिर्मित Technology आहे. ह्यात शंका नाही. Gemini मध्ये फक्त Text पुरताच काम नाही तर, Voice, Image, Coding सुद्धा करून देते. अजून पण नवनवीन Upcomming Feature येणे चालू आहे. चला तर विस्तृतपणे समजून घेऊ या Google च्या Gemini Product ला अगदीच सोप्या शब्दात.


Google Gemini कसे AI Product आहे?

हे एक Multimodal AI System आहे. असे म्हटले जाते. एक प्रकारे Multitasking करू शकणारा नव्या पिढीचा AI Model आहे. ज्यात Audio (Voice), Video, Image Converter सुद्धा आहे. म्हणजे कसं ते बघा. समजा आपण आपला Photo तिथे Upload केला आणि त्याला म्हटले की, Animated Picture बनून दे तर ते जशास तसा बनून देऊ शकतो. ही एक अभूतपूर्व Technology ह्या Gemini मध्ये आहे. एवढंच नाही तर Chat Gpt अँप मध्ये किंवा अन्य कुठल्याही App मध्ये आपण आपला फोटो अपलोड करायचं आणि त्याचा Prompt दे म्हणायचं त्यावरून ते आपल्या चेहऱ्याचा हावभाव ओळखतो आणि आहे तसं Prompt मध्ये Mentioned करतो आणि मग पुढं ते Prompt आपण Gemini मध्ये टाकला तर त्यातून Animated Picture सुद्धा बनून भेटल. ते Prompt च्या मदतीने शक्य आहे. असं किती आणि काही काही करता येऊ शकते. Tool website बनवायची असेल तर त्याची कोडिंग सुद्धा Gemini करून देऊ शकतो. मी हे सर्व काही अनुभवातून सांगत आहे. स्वतः केलेलं आहे. असे अनेकानेक छोटेमोठे Task आपण Gemini च्या मध्यातून करून घेऊ शकतो.



Google Gemini कार्य कसा करतो?

प्रत्येक AI Platform ची कार्य करण्याची पद्धत ज्याच्या त्याच्या प्रोग्रॅमिंग च्या आधारे वेगळी असू शकते. किंवा काही अंशी समान देखील असू शकते. 

आता Gemini मुख्यतः ४ प्रकारे काम करतो. म्हणजे त्या त्या टप्प्यात ते काम पूर्ण करत असतो. 


१) Data समजून घेणे - 

सामान्यतः सगळ्याच AI अँप्स OR Platform मध्ये हे सामान्य प्रक्रिया असते. युजर्स चा Data समजून घेऊन त्यावर योग्य ते प्रत्युत्तर देणे. User कोणत्या भाषेत संवाद करत आहे बरोबर त्याच भाषेत संवाद प्रत्युत्तर AI Technology देत असतो. Image असेल तर ते ओळखून युजर ची प्रतिक्रिया काय आहे त्यानुसार योग्य ते संश्लेषण AI देता.



२) Machine Learning आणि Deep Learning - 

ह्या मध्ये अनुभवातून शिकणे ही प्रमुख प्रक्रिया असते. दिवसाला कितीतरी युजर्स भेट देतात आणि सदर च्या AI Technology Feature चा फायदा घेतात. आणि मुख्य म्हणजे Feedback इथे महत्त्वाचा समजला जातो. त्यानुसार AI प्रोग्राम मध्ये तो तो बदल अपेक्षित घडत जातो. म्हणजेच Machine learning कशी कार्य करते ते सोप्या शब्दात समजले असणार. 



३) Context Analysis - 

म्हणजेच युजर ला हवे तसे योग्य ते प्रत्युत्तर देणे. युजर ला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते एकदम योग्य पद्धतीने समजून सांगणे. केवळ शब्द, वाक्य किंवा Data बघून नव्हे तर, User कुणासाठी, कुठल्या परिस्थिती, कशासाठी विचारतोय हे समजणे म्हणजेच Context Analysis होय.  



४) Response Generation - 

सगळ्यात महत्वाची Step म्हणजे Response. User पूर्ण संतुष्ट झाला पाहिजे. त्याच्या सगळ्या समस्याचे निराकरण योग्य पद्धतीने झाले पाहिजे. साध्या आणि Understading Language मध्ये योग्य ते Response देणे महत्वाचे असते. Logical Response आणि Human like उत्तर देण्याची पद्धत असे अनेक प्रकारे युजर Oriented Response देणे हे महत्वाचे मानले जाते.



Google Gemini चे काही मुख्य Features -

Gemini AI चे काही महत्त्वपूर्ण असे कामाचे Features आहेत. जे की आपल्याला एक युजर म्हणून समजून घेणे आवश्यक आहे.


Multimodal AI - जसे की वरील माहिती मध्ये बघितले आहेच. Text, Image, Voice आणि coding ह्यासारख्या Multiple Modals Use करता येतात. आणि अजून पण असे नवनवीन फिचर्स पण Upcomming येणार आहेतच. आणि जे आहेत ते खरंच खूप उपयुक्त असे आहेत.


Fast and Accurate Response - Instant प्रत्युत्तर देणारा Gemini हा आहे. ह्या मध्ये हा Powerful Infrastructure वर develop केलेला AI आहे. त्या कारणे Response जलद मिळतात. Repetitive उत्तर जास्त मिळत नाहीत. मुख्य उद्देश युजर ओरिएंटेड असतो.


Coding Help - Developer साठी एक Supporter किंवा assistant म्हटले तरी चालेल. कोडिंग लिहून देते, त्यातील चुका सांगते, Debugging Suggestions पण देते. त्यामुळे हा AI त्याबाबतीत खूप Strong वाटतो. 


Creative Writing आणि Content Generation - Content Creators साठी चा Best friend आहे. एकदम भारी माहितीची मांडणी करतो. सादरीकरण करत वेळी युजर ला कोणत्या माहिती हवी आहे. त्यानुसार माहिती दिली जाते.


Google Search आणि Tool सोबत Integration - सगळ्यात महत्त्वाचा Point असा की, हा Gemini AI Platform Google च्या सगळ्या अँप्स मध्ये दिसत आहे. Officially Google चे AI product असल्याने हे गुगल ॲप्स मध्ये असेलच.


Google Gemini चा वापर नेमका कुठे केला जातो?


Content Creation - 

अनेक प्रकारचा content जसे की, captions, Blog Articles अशा अनेक मध्ये हे Use केला जातो. Website description, Summary, Article Title suggestions वगैरे मध्ये जास्तीत जास्त फायदा होते.



Study Related Help -

Students ना notes, assignment वगैरे मध्ये Best mentor ची भूमिका बजावतो. Logical Concepts Easy करून सांगतो. MCQ, test मध्ये helpful ठरतो. Study करायचा वेळापत्रक किंवा अजून Study Related कोणत्याही छोट्या मोठ्या कामांसाठी हा AI एकदम perfect आहे. अशा अनेक पद्धतीची मदत मिळते.



Coding मध्ये मदत -

Coding मध्ये विशेष मदत मिळते. Code script तयार करून देतो. Python, Java अशा अनेक ज्या भाषा असतात त्या भाषेत Coding मध्ये मदत भेटते. Coding मध्ये मदत मिळणे. वगैरे साठी देखील जास्त मदतगार आहे. अँप्स आणि वेबसाईट Coding करत बनवायची असेल तर जास्त मदत मिळते.



Business Planning idea's 

Business related मदत देखील मिळते. स्टार्टअप विषयी मार्गदर्शक म्हणून देखील मार्गदर्शन मिळते. मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून सांगतो. वगैरे विषयी जास्त माहिती मिळते. Business मध्ये जास्त महत्वाची भूमिका हा AI ची आहे.



अशा प्रकारे Google Gemini AI विषयी ची माहिती आहे. Gemini हा एक Powerful AI आहे. Multimodal Technology चा AI आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Machine Learning काय आहे? आजच्या AI जगातील उपयोग

Machin Learning ची स्पष्ट परिभाषा काय? Machine Learning ही अशी तंत्रज्ञान पद्धती आहे ज्यामध्ये संगणकाला थेट प्रोग्रॅम न करता दिलेल्या डेटामधून नमुने ओळखून स्वतः शिकण्याची क्षमता दिली जाते. या शिकलेल्या नमुन्यांचा उपयोग करून मशीन भविष्यात निर्णय घेऊ शकते, वर्गीकरण करू शकते किंवा एखाद्या गोष्टीचा अंदाज वर्तवू शकते. उदाहरणार्थ 100 घरांच्या Area, Location, Rooms आणि किंमत यांसारख्या माहितीवरून ML मॉडेल घरांच्या किंमतीतील नमुने शिकते आणि नंतर नवीन घराची किंमत अंदाजाने सांगू शकते. ML कार्य कसे करते - मशीन लर्निंग पूर्ण कार्य करण्याची पद्धती ही ४ टप्प्यात असते असे मानली जाते. पहिला टप्पा - Data Collection एखादे मॉडेल शिकण्यासाठी उदाहरणे लागतात. त्यालाच Data म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचा डेटा असतो. डेटा हा ML चे इंधन मानले जाते. डेटा भेटल्याशिवाय ML ची प्रक्रिया पुढे सरकत नाही. त्यामुळे Data Collection First Stage महत्त्वाची असते. दुसरा टप्पा - Data Clearing Data हा कच्चा समजून त्यातील चुका वगैरे व्यवस्थित केला जातो. ML मॉडेलला शिकवण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडसर ठरू नये ह्याची द...